relationship


काही लोकांना पहिल्या नजरेतच आपलं खरं प्रेम सापडतं तर काही लोकांना रिलेशनशीपमध्ये (relationship) आल्यानंतरही हेच वाटत राहतं की आपण अपेक्षा केली होती तसं काहीच या नात्यात नाही. प्रत्येकासाठीच आपलं पहिलं प्रेम खूप रोमॅंटिक व दिवा स्वप्नांनी भरलेलं असतं, पण तरीही काही लोकांना नातं तुटण्याची भीती वाटत राहते. त्यांच्या मनात असे कितीतरी प्रश्न वादळ निर्माण करत असतात ज्याची उत्तरं ते आपल्या जोडीदाराकडून (life partner) मागू इच्छित असतात.

अशावेळी जेव्हा प्रश्न बॉयफ्रेंडच्या प्रश्नांचा येतो तेव्हा ते आपल्या प्रेयसीला असे काही प्रश्न विचारतात ज्याने नात्यातील समतोल स्पष्ट होईल व नातं पुढे घेऊन जाण्यासाठी मनात कोणतीही शंका राहणार नाही. हो, आता ती गोष्ट वेगळी की काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरं देणं बहुतांश मुलींना अजिबात आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही अशा ५ प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे कधीच आपल्या प्रेयसीला विचारू नयेत, जेणे करून नातं आनंदी व हसतं-खेळतं राहिल.

--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------

मी तुझं पहिलं प्रेम आहे का?

नेहमीच मुलं प्रेमाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात की आपल्या प्रेयसीने आपल्याआधी इतर कोणाला डेट केलं आहे का? जर हो, तर मग तिचं पहिलं नातं का तुटलं? असो, पण या प्रश्नाचं उत्तर देणं कोणासाठीच सोपं नाही. पण इच्छा नसतानाही मुलींना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. पण नात्यात असताना दोघांनाही ती प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार आहे जी नात्यासाठी महत्त्वाची आहे. भूतकाळ जाणून घेणं हा हक्क असला म्हणून उठसूठ जोडीदारावर (life partner) याविषयी प्रश्नांचा भडिमार करणं मात्र चूक असतं.


तुझ्या आई-वडिलांना मी पसंत पडेन का?

प्रेयसीच्या आई-वडिलांना भेटणं हे मुलांसाठी सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. यामुळे मुलं सतत मुलींना कुटुंबीयांविषयी प्रश्न करून त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरं तर त्या मुलीकडे नसतं पण त्याच्या समाधानासाठी उत्तर हो असंत द्यावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही नात्यात पूर्ण रुळत नाही तोपर्यंत असे प्रश्न जोडीदाराला विचारू नका, कारण हे प्रश्न फक्त त्रासच देतात. हा प्रश्न प्रेयसीच्या आई-वडिल व तुमच्या स्वभावावर निर्भर आहे की ते तुम्हाला पसंत करतील की नाही?

लग्नानंतर नोकरी करणार की नाही?

कधी कधी असंही होतं की जोडीदाराला आपल्या पत्नीच्या आयुष्यात जास्त लोक असलेले आवडत नाहीत आणि त्यामुळे तिने कामावर जाऊ नये अशी त्याची अपेक्षा असते. अशावेळी जेव्हा लग्नाचा विषय निघतो तेव्हा अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीला जॉब सोडण्याविषयी प्रश्न करू लागतात. असे प्रश्न विचारताना ते विसरून जातात की नोकरी करत असणा-या मुलीलाच त्यांनी पसंत केलं होतं. मग प्रश्न हा निर्माण होतो की जर एखाद्याबद्दल आपली मतं ठरलेली असतील तर नातं सुरूच का करावं? हल्लीच्या मुलींना आत्मनिर्भर व स्वतंत्र राहायला आवडतं आणि मुलंही पसंत करताना अशाच मुली पसंत करतात ज्या धैर्याने घर व जॉब सांभाळतात. त्यामुळे लग्नानंतर मुलीने घरी बसावं या विचारांच्या मुलाला व त्याच्या प्रश्नांना मुली वैतागतात.

माझ्या कुटुंबासाठी तडजोड करशील का?

लग्नासाठी मुलगी (relationship) पाहणारा प्रत्येक मुलगा हाच विचार करतो की ही आपल्या कुटुंबासोबत जमवून घेईल का? वेळेप्रसंगी त्यांच्यासाठी तडजोड करेल का? आणि मुलांचा हा विचार योग्य देखील आहे. पण लग्नाआधी कोणत्याच मुलीला या प्रश्नाचं सहजासहजी उत्तर देणं शक्य नसतं. तुम्ही तुमच्या जागी योग्य असता त्यामुळे तुम्ही आपल्या प्रेयसीजवळ भावना व मत व्यक्त करणं साधारण आहे पण तिच्या बाजूने विचार केल्यास समजेल की एखादं नातं निभावण्यासाठी प्रेम व विश्वास दोन्ही बाजूंनी असावं लागतं. जोपर्यंत ती कुटुंबात येऊन राहात नाही व सर्वांचा स्वभाव जाणून घेत नाही तोपर्यंत कोणतीही शाश्वती देणं त्या मुलीसाठीही कठीण असतं.