sugar factorypolitics news- शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर (kolhapur) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कोल्हापुरातील आजरा साखर कारखान्याबाबत त्यांना विचारणा केली असता. तेव्हा त्यावर मंत्री शिंदे म्हणाले की, आजरा साखर कारखान्याबाबत (sugar factory) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

शिंदे म्हणाले या विषयावर चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, सहकारमंत्री आणि आमची चर्चा झाली आहे. विषय सर्वांच्या लक्षात आला आहे. त्यासाठी काय करायचे आहे हे देखील ठरले आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यासह मी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. 

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

कोणत्याही परिस्थितीत आजरा कारखाना सहकारी (sugar factory) तत्त्वावर चालू राहिला पाहिजे यासाठी जे करणे शक्य आहे ते केले जाईल असे ते म्हणाले. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर आणि आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनीही मंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली आहे.