बलात्काराच्या (rape case) आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्यावर राजकीय संकट निर्माण झालं आहे. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची (resignation) मागणी केली आहे, याप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भाजपाच्या महिला आघाडीनं दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे एकाकी पडल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाकडूनही ठोसपणे कोणीही धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभं राहिलं नाही.
मंत्री नवाब मलिक यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कौटुंबिक आहेत, त्यावर तेच बोलू शकतात असं सांगत हात काढून घेतले आहेत. रेणु शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडेंवर बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने बलात्काराचे आरोप (rape case) केले आहेत, त्यामुळे राजकारणातील या तरूण नेत्याची कारकिर्द धोक्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्याचसोबत अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या बड्या नेत्यांचीही भेट घेणं सुरु आहे.
--------------------------------------
Must Read
आमदारकी आणि मंत्रिपदावरही टांगती तलवार
त्यातच मीडियाचा ससेमिरी चुकवण्यासाठी धनंजय मुंडे भल्या पहाटे मलबार येथील शासकीय बंगल्यात दाखल झाले, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे धनंजय मुंडे यांच्यामागे आहेत, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर (social media) स्पष्टीकरण दिलं असलं तरी अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. यातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या मुलांबाबत माहिती लपवली असल्याचा आरोप केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावरही टांगती तलवार (resignation) कायम आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. यात आतमध्ये कोण बसलं आहे हेदेखील दिसत नव्हते, इतकचं नव्हे तर कोणत्याही सुरक्षेचा ताफा न घेता धनंजय मुंडे यांनी माध्यमांना चकवा देत मुंबईतील शासकीय निवासस्थानी एन्ट्री केली.