Dhananjay Mundeराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची (rape case)तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या आरोपानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर शर्मा यांनी सलग ट्विट् (twitter post)करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का कले होते ? याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच, पोलीस जेव्हा या गोष्टीचा तपास करतील तेंव्हा या सगळ काही समोर येईल,असेही तीने म्हटले आहे.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

गायिका शर्माने मुंडे यांनी बलात्कार (rape case)केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत मुंडेनी लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केली तसेच बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर समाज माध्यमांवार दिवसभर याच गोष्टीची चर्चा सुरू होती. या प्रकारानंतर काहींनी मुंडे यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले. तर काहींनी शर्मा यांची बाजू घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

त्यानंतर शर्मा यांनी सलग ट्विट (twitter post) करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेंव्हा सर्व काही समोर येईलच, असे म्हटले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.