Dhananjay Munde


बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे समर्थक आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी (election) विजय मिळवला आहे. त्यामुळे मुडेंवर झालेल्या आरोपांमुळे मतांवर कोणताह परिणाम झाला नाही हे स्पष्ट झालं आहे.

परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय (election) मिळवला आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या.दरम्यान, भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.

-------------------------------------

Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------