ajit pawarमहाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. आम्ही आमचा किमान समान कार्यक्रम ठरवलेला आहे त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराविषयी तिन्ही पक्षांचे (party politics) नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm ajit pawar)  यांनी दिली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, मी मागील आठवड्यातच याबाबत बोललो होतो. तिघांचे (party politics) सरकार चालत असताना काही विषय कधी निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धतीचा मार्ग काढू. आज आमची बैठक आहे. या प्रकरणात नक्की काय झाले. जाणीवपूर्वक गडबड केली का, या बाबी तपासल्या जातील. आम्ही एकत्र मार्ग काढू. कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, यामागचे नक्की कारण काय पाहून, शहानिशा करूनच याविषयी वक्तव्य करेन.

-------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

मेट्रो कारशेड प्रकरणात मुख्यमंत्री स्वत: लक्ष देत असून ते मार्ग काढतील, असे सांगून पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले होते. मुंबईतील जंगल असलेल्या परिसरात मेट्रो कारशेड करणे ठाकरेंना पूर्वीपासूनच मान्य नव्हते. मग कांजूरमार्गचा पर्याय समोर आला. काही जण म्हणतात ती जागा केंद्र सरकारची आहे, एक जण म्हणतो माझी आहे. राज्याचे अधिकारी म्हणतात राज्याची आहे. मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष देत आहेत, ते मार्ग काढतील.

प्रीमियम निर्णयावर विरोधकांची टीका करता पवार म्हणाले, विरोधकांना जाणीवपूर्वक तशी टीका करायची आहे, त्यांना काम नाही. मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेतला, तेव्हाही विरोधकांनी टीका केली. तो निर्णय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरेदीविक्रीचे व्यवहार झाले, यापूर्वी तेवढे कधीच झाले नव्हते. याचा फायदा सर्वांना झाला. ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. तीन टक्के आम्ही सोसले, दोन टक्के बिल्डरांनी सोसले. म्हणजेच सदनिका घेणाऱ्यांचा पाच टक्के फायदा झाला. प्रीमियमचा निर्णय घेतानाही ग्राहक हित लक्षात घेतले आहे. एसआरएचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याचे अजित पवार म्हणाले.