death-by-stabbing

(Crime) येथील जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील (Beatingजखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशोक नवनाथ जानराव ( वय ५७, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) असे मृताचे नाव आहे. मुलगा अमोल अशोक जानराव याच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव, पद्मिनी अभिमान जानराव व सुनिता सुधाकर जानराव ( सर्व रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

-----------------------------------

Must Read

1) पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

2) इंटरनेट केबलची चोरी करणार्‍यास अटक

3) वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटर कामाची नव्याने निविदा

-----------------------------------

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, जानराव कुटुंबियात घराच्या जागेतील वाद आहे. याच वादातून शनिवारी ( ता. १६ ) मारामारी झाली. संतोष, सुधाकर, पद्मिनी व सुनिता यांनी अमोल, अमोलचा भाऊ, आई व वडील अशोक यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. (Crime) यामध्ये अशोक जानराव यांच्या पोटावर तीव्र मार लागल्याने त्यांचा आतड्याला छिद्रे पडली. त्यांच्यावर तात्काळ कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.