dhoom4


‘धूम’ (Dhoom) चित्रपटाच्या पुढील सिक्वेलबद्दल (Sequel)चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दाटली आहे. 2013 पासून चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अ‍ॅक्शननं (Action film) परिपूर्ण असलेल्या धूम चित्रपटाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. धूम 3 चित्रपटातून आमिर खाननं (Aamir khan) आपल्या अभिनयचा जबरदस्त जलवा दाखवला होता. या चित्रपटानं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकुळ घालत अनेक रेकॉर्ड तोडले होते. धूम सीरीजमधल्या (Dhoom series) प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे.

जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन धूम-2  मध्ये एकत्र दिसले होते. आता धूम सीरीजच्या पुढील भागातही या दोन अॅक्शन हिरोंचे धमाकेदार सीन  (Action film)  आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण या चित्रपटात जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन दोघंही एकत्र दिसणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळं चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यशराज फिल्म या दोन्ही अॅक्शन हिरोंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आता कुठे ते दोघं पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं आहेत.

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

असं झाल्यास हा चित्रपटात अॅक्शन सीनच्या (Action film)  बाबतीत एक वेगळीच उंची गाठेल. शिवाय या चित्रपटात दीपिका पादुकोणही दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण (deepika padukone) लेडी व्हिलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपिकाला नकारात्मक भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. यापूर्वीही दीपिकानं नकारात्मक भूमिका साकारली आहे. ती याआधी अक्षय कुमार सोबत 'चांदनी चौक टू चायना' या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसली आहे. या चित्रपटात दीपिकाची दुहेरी भूमिका होती.