suresh raina


इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वापूर्वी चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) काही टफ कॉल घेतले आहे. यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तील निराशाजनक कामगिरीनंतर संघात बरेच बदल अपेक्षित होते आणि त्या दृष्टीनं फ्रँचायझीनं मोठे निर्णय घेतले. हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याला रिलीज केल्यानंतर CSK संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाला ( Suresh Raina) कायम ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांची ही प्रतीक्षा संपली असून महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघानं आयपीएल २०२१साठी बुधवारी मोठे निर्णय घेतले. (cricket news)

आयपीएल २०२१साठी प्रत्येक फ्रँचायझी संघात बदल करणार आहेत. त्यासाठी हे मिनी ऑक्शन घेण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) खात्यात  सर्वात कमी १५ लाख रुपये शिल्लक आहेत. आपल्या खात्यातील रक्कम वाढवण्यासाठी चेन्नई केदार जाधव ( Kedar Jadhav), पियुष चावला या दोन खेळाडूंना रिलिज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ही शक्यता खरी ठरली असून केदार जाधव, पियूष आणि मुरली विजय यांना रिलिज केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  याबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत जाहीर केला जाईल. ड्वेन ब्राव्हो आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांना संघानं कायम ठेवले आहे, तर शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे. 

-----------------------------------

Must Read

1) पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

2) इंटरनेट केबलची चोरी करणार्‍यास अटक

3) वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटर कामाची नव्याने निविदा

-----------------------------------

आयपीएल २०२०त सुरुवातीला अनेक नाट्यमय गोष्टी घडल्या. यूएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईचे खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह सापडले. त्यानंतर सुरेश रैनानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर बरीच चर्चा रंगली. धोनी व त्याच्यात हॉटेल रुमवरून वाद झाल्याचं सांगण्यात आलं, परंतु त्यात तथ्य नव्हते. रैनाच्या आत्या व काकांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला केला आणि त्यात काका व त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे रैना मायदेशात परतला. त्यानंतर रैनाचा CSKसोबतचा प्रवास संपला अशा बातम्या आल्या. पण, चेन्नईनं त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ANIने प्रसिद्ध केले आहे.

रैनानं चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) आयपीएलमध्ये सर्वाधिक ४५२७ धावा केल्या आहेत.  रैनानं मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.  (cricket news)

''सुरेश रैना हा संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. तो संघाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला करारमुक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यूएईतून माघारी परतण्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय होता आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्या निर्णयाचा आदर आहे. केदार जाधव, पियूष आणि मुरली विजय यांच्याबाबतचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल,''असे सूत्रांनी सांगितले.