crows-die-of-bird-flu-in-india-what-is-bird-flu-

(Bird Flu) राजस्थानमध्ये अचानक हजारो कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्लूचा (bird flu) धोका समोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटानंतर प्राण्यांमध्ये फ्लू आढळून आल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले असून राजस्थानमधील मृत कावळ्यांमधे एवियन इंफ्लूएंजा आढळून आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा प्रश्न समोर उभा राहिला असून मध्य प्रदेश आणि हिमचहला प्रदेशमधील अनेक पक्षांमध्ये देखील हा पसरला आहे. बर्ड फ्लू (bird flu) हा आजार संसर्गजन्य असल्याने मानवामध्ये देखील पसरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) माहितीनुसार 1997 मध्ये सर्वात आधी एवियन इंफ्लूएंजा आढळून आला होता. याचे संक्रमण जास्तकरून प्राण्यांमधूनच पसरते. बर्ड फ्लू(bird flu) हा पक्षी, मानव आणि प्राण्यांना देखील होत असल्याने याचा धोका सर्वांना आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने यामध्ये जीव जाण्याचा देखील धोका आहे. H5N1 एवियन इंफ्लूएंजा असे या विषाणूचे सर्वसामान्य रूप आहे. 

---------------------------------------

Must Read

1) खाणीमध्ये आढळून आलेल्या यूवकाचा खून

2) इचलकरंजीत सभापती निवड बिनविरोध

3) Marathi Joke : नवरा आणि बायको

---------------------------------------

1997 मध्ये हाँगकाँगमध्ये या विषाणूचा तपास लागल्यानंतर हा आजार पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून आला होता. या व्यक्तींमध्ये हा विषाणू आढळून आल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळे नियम बनवण्यात आले होते. हा विषाणू समोर आल्यानंतर अनेकांना हे समजले नाही. त्यामुळे संक्रमित चिकन खाल्ल्याने अनेक जणांना नुकसान झाले होते. याचबरोबर चिकन खाणाऱ्या व्यक्तींसाठी खास नियम तयार करण्यात आले होते. कच्चे किंवा नीट शिजवलेलं चिकन खाल्ल्याने हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

अनेकदा पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या आजाराची लागण होते. यामध्ये पक्ष्यांची निगा राखताना किंवा त्यांची साफसफाई करताना व्यक्तींना या विषाणूची लागण होऊ शकते. (Bird Flu) यामध्ये प्राणी जिवंत असो कि मृत कोणत्याही पद्धतीने हा विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्याचबरोबर कच्चे किंवा नीट शिजवलेलं चिकन खाल्ल्याने देखील हा आजार पसरू शकतो.

या आजाराची लक्षणे सामान्य असल्याने लवकर ओळखू येत नाही. ताप, सर्दी, डोकेदुखी, स्नायू कडक होणे, अतिसार, मळमळ किंवा उलट्या होणे, खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना आणि डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. यामध्ये अनेकदा जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर आपल्याला हा आजार असल्याचे निदान होते. या आजाराचा सर्वात जास्त प्रभाव हा फुफ्फुसांवर होत असल्याने श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.

एवियन इंफ्लूएंजा या विषाणूचा तपास लागण्यासाठी RT-PCR नावाची एक टेस्ट आहे. यासाठी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) ने ही टेस्ट मंजूर केली आहे. त्यामुळे या टेस्टच्या मदतीने कोणता आजार आहे हे समजू शकते. सुरुवातीला कोरोना व्हायरससाठी देखील याच टेस्टचा वापर करण्यात येत आला होता. त्यामुळं ही टेस्ट यासाठी खूप महत्त्वाची आहे.

प्रत्येक पक्षापासून पसरणारा बर्ड फ्लू(bird flu) हा वेगळा असतो. यामध्ये याचे उपचार देखील वेगवेगळे आहेत. अनेकदा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळे उपचार करावे लागतात. यासाठी ओसेल्टामिविर (टॅमीफ्लू) आणि रेलेएंजा सारख्या औषधांनी हा आजार बरा होऊ शकतो. आतापर्यंत मानवांमधून हा आजार खूप कमी संक्रमित झाला आहे. परंतु शक्यता असल्याने आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. सध्या पुन्हा एकदा याने डोके वर काढल्याने मानवाची चिंता वाढली आहे.