political parties


आगमी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावा घेत रणशिंग फुंकले आहे. तसेच येत्या दोन महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.  (political parties)

आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपाच्या तगड्या आव्हानासमोर शिवसेनेनं (why do we need political parties) मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. 

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

शिवसेना (political parties) गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. 

गेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पोस्टरच्या माध्यमातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी ‘केम छो वरळी’ असं गुजराती भाषेतील पोस्टर लावण्यात आले होते.