crime newscrime news- आसाम (जि. होजाई लंका) येथील 19 वर्षीय गर्भवती युवतीचे अपहरण करून तसेच तिच्या तीन वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार (molestation)  केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला आहे. पीडित युवतीने मुख्य संशयित महिला काजल शंकर योगी (35, रा. सापुरा, ता. बिराटनगर, जयपूर, राजस्थान) हिच्यासह चौघांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल केली.

सप्टेंबर 2020 ते 8 जानेवारी 2021 या काळात पाचगाव (ता. करवीर) येथील रायगड कॉलनीतील भाड्याच्या खोलीत तसेच आसाम व राजस्थान येथे हा प्रकार घडल्याचे पीडितेने म्हटले आहे. संशयित महिला काजल योगीसह रामकरण बंसीधर योगी (35, रा.मूळ गाव मेढ, ता. बिराटनगर, जि. जयपूर, राजस्थान), दिलीप रामेश्‍वर योगी (30), सीमा दिलीप योगी (22, रा. मूळ गाव झाडलीपुराणी, ता. अजितगड, जि. सिक्‍कर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरा रामकरण योगी याला ताब्यात घेण्यात आले, असे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, पीडित युवती मूळची आसाम राज्यातील असून, मुख्य संशयित काजल योगी हिने तिला राम ठाकूरनगर येथील तिच्या नातेवाईकांच्या घरी बोलावून घेतले. पिण्याच्या पाण्यातून औषध देऊन बेशुद्ध केले. त्याच अवस्थेत तिचे अपहरण करण्यात आले. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन रामकरण योगी याच्याशी तिचा जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला.

विकत आणले आहे, सांगू तेच करावे लागेल!

लग्‍नानंतर तिला आसाम, राजस्थान व तेथून पाचगाव येथील रायगड कॉलनीत भाड्याच्या खोलीत आणून डांबून ठेवण्यात आले. पीडिता गर्भवती असतानाही संशयित रामकरण, दिलीप योगी यांनी तिच्यावर अत्याचार (molestation)  केल्याचे म्हटले आहे. संशयितांनी 'आम्ही तुला विकत घेतले आहे. आम्ही जे सांगू तेच तुला करावे लागेल, असे बजावून वेळोवेळी मारहाण केली.

तीन अनोळखी व्यक्‍तींकडून अत्याचार

शारीरिक, मानसिक त्रास देऊनही रामकरण याने तिघा अनोळखी व्यक्‍तींना पीडितेवर अत्याचार करण्यास भाग पाडले. तसेच संशयित सीमा योगी हिने वारंवार शिवीगाळ व मारहाण केल्याचे पीडितेने नमूद केले आहे.