crime-against-a-youth-in-a-molestation-case

(Crime) मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तरुणीचा विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शंकर ननवरे (वय 22 रा. चंदूर) असे त्याचे नांव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पिडीत तरुणी व संशयित प्रशांत ननवरे हे चंदूर येथे एकाच परिसरात राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी पिडीत तरुणी ही घरासमोर थांबली असताना प्रशांत त्याठिकाणी आला. त्याने तिच्याशी लगट करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. (Crime) या प्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन ननवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.