BCCIsports news- भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy)  स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI)  घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

कोणती स्पर्धा होणार?

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021) सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

------------------------------------

मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचं वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

काय आहे कारण?

BCCI कडं रणजी स्पर्धा घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध राहवं लागेल. (sports news)

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.