rishabh pant


sports news- टीम इंडियाने (Team India) ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव (test match) करुन इतिहास घडवला आहे. ब्रिस्बेनमध्ये शेवटपर्यंत रंगलेल्या चुरशीचा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच ब्रिस्बेनमध्ये 32 वर्ष अपराजित राहण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रमही भारतीय टीमनं मोडला आहे. तसंच, सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर (Border-Gavasakar ) करंडक जिंकला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी केलं अभिनंदन

या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय टीमचं (Team India) सर्वत्र अभिनंदन होत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक खास व्हिडीओ (Video) शेअर करुन भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमधील दोन दृश्य या व्हिडीओमध्ये वापरण्यात आली आहेत. ब्रिस्बेन टेस्टमध्ये विकेट कीपिंग करत असताना ऋषभ पंत स्पायडर मॅनचं गाणं म्हणत होता, हाच व्हिडिओ उत्तर प्रदेश पोलिसांनी शेयर केला आहे. याचसोबत त्यांनी पंतने लगावलेल्या विजयी चौकाराचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. या दोन्ही व्हिडिओला उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पायडरमॅन ते सुपरमॅन असं नाव दिलं आहे.

-----------------------------------

Must Read

1) पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

2) इंटरनेट केबलची चोरी करणार्‍यास अटक

3) वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटर कामाची नव्याने निविदा

-----------------------------------

‘या पॅनटास्टिक (Pan-tastic) विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. तुम्ही एखाद्या योद्धाप्रमाणे खेळला. चिकाटी, कौशल्य आणि पॅशननं खेळ करुन ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल तुमचा अभिमान आहे.’ या शब्दात उत्तर प्रदेश पोलिसांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.


स्पायडरमॅनचा इतिहास काय?

ऋषभ पंतला  (Rishabh Pant) स्टम्पमागे आपण अनेकदा प्रतिस्पर्धी बॅट्समनशी बोलताना किंवा बॉलरला मार्गदर्शन करताना पाहतो. स्टम्पमागे चर्चेचा किंवा बोलण्याचा आवाज स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड होतो. चौथ्या टेस्ट (test match) मॅचदरम्यानही ऋषभ पंत गाणं गात असतानाचा आवाजही स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत 'स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन' हे गाणं गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कॅप्टन टिम पेन (Tim Paine) आणि कॅमरुन ग्रीन(Cameron Green) बॅटिंग करतानाचा हा व्हिडीओ आहे.

अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन

गाबावर भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.