कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वात मोठा फटका हा शाळा (school), महाविद्यालयांना बसला आहे. मागच्या वर्षी अगदी शैक्षणिक सत्र संपताना कोरोना व्हायरसचा विषाणू देशात आला. त्यामुळे अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढं ढकलाव्या लागल्या. चालू शैक्षणिक वर्षाचंही कोरोनामुळं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरु होत आहेत. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) फेब्रुवारी महिन्यात सरकारी शाळा सुरु करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. त्याचवेळी शाळेतील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं तपासणीमध्ये उघड झालं आहे. राज्यातील मंडी (Mandi) जिल्ह्यातील शिक्षकांची शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तब्बल 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

हिमाचल प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात शाळा(school) सुरु होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या तपासणीत किन्नौर जिल्ह्यातील 19 तर बिलासपूर आणि सिमला जिल्ह्यातील 1 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यातील कोरोना पेशंट्सची एकूण संख्या 57424 वर पोहचली आहे. यापैकी 314 सक्रीय पेशंट्स आहेत. तर, 56131 पेशंट्स बरे झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये 963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शाळा कधी सुरु होणार?

राज्य सरकारच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारीपासून सरकारी शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होतील. तर डिग्री कॉलेज 8 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. खासगी शाळांनाही याच कालावधीमध्ये नियमित वर्ग सुरु करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. राज्यातील सर्व शाळांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि त्यामधील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी यांचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. मात्र त्यापूर्वी सरकारी शाळांमधील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं पालकांच्या काळजीत भर पडली आहे.