कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 3 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त (Coronam free) झाले असून रिकव्हरी रेट 94.64 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 509 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 364 दिवसांवर पोहोचला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू झाला तर मृत्युदर 2.57 वर आला आहे.राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 27 लाख 47 हजार 633 चाचण्या झाल्या असून 19 लाख 32 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 81 हजार 303 जण होम क्वारंटाइन असून 3 हजार 578 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.


-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------


मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली


कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 980 जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात 714 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 364 दिवसांवर पोहोचला आहे.मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या 11 हजार 116 वर पोहोचली आहे.


मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 73 हजार 444 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 364 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 14 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 23 लाख 56 हजार 465 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 93 हजार 436 वर पोहोचली आहे.