confirmed-shanaya-alias-rasika-sunil-dating-person

(gem tv serial) अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunilछोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली. त्या पोस्टची सर्वत्र चर्चा होताना दिसली. या पोस्टमधील फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा तरूण कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले होते. अखेर तिने याबाबतचा उलगडा केला आहे.

रसिका सुनीलने न्यू इअरच्या शुभेच्छा देत फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिले होते. तिने लिहिले की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन... या वर्षाची मी ऋणी असण्याचे (gem tv serialसगळ्यात मोठे कारण म्हणजे तू...


------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------


रसिकाच्या या पोस्टनंतर ती या व्यक्तीला डेट करते अशी चर्चा सगळीकडे रंगताना दिसली. मात्र त्याबद्दल नुकताच तिने खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे कबूल केले आहे. तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.


आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.


रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती बसस्टॉप, गर्लफ्रेंड व गॅटमॅट चित्रपटात झळकली आहे.