ichalkaranji nagaraparishad politicslocal news - नूतन सभापती पदाच्या निवडीच्या निमित्ताने पून्हा एकदा पालिकेचे राजकारण ढवळून निघाले. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांची समझोता एक्‍प्रेस सुसाट धावली असली तरी निवडीपर्यंत अत्यंत अस्थीर राजकीय (politics)वातावरण निर्माण झाले होते. 

मात्र या निमित्ताने पडद्यामागे अनेक घडामोडी झाल्या असून त्याचे पडसाद नजिकच्या काळात उमटण्याचे संकेत मिळत आहेत. वर्षभरानंतर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या कारभारात चांगली सुधारणा करण्याचे मोठे आव्हान विद्यमान सत्तेसमोर असणार आहे. 

वर्षभरापूर्वी आवाडे-हाळवणकर- कारंडे एकत्र आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या आघाडीत वर्षभर अनेकवेळा समन्वयाचा अभाव दिसला. त्यामुळे विरोधकांनी बऱ्याच वेळा बाजी मारली. त्याचे पडसाद नवीन सभापती पदाच्या निवडीवेळी उमटतील अशी शक्‍यता होती. पण तसे चित्र दिसले नाही.

-------------------------------------------
Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

दुसरीकडे आमदार आवाडे यांनी पालिका सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामळे त्यांच्या भूमिकेकडे या वेळी विशेष लक्ष होते. पण सत्तेची सुत्रे आपल्या हातात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला पवित्रा बदलला. त्यातून त्यांनी अतिशय वजनदार असे आरोग्य समितीपद पदरात पाडून घेतली. त्यांच्या या राजकीय खेळीची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या भूमिकेचा कोणाला तोटा व कोणाला फायदा झाला, याची चर्चा पुढील कांही दिवस होत राहणार आहे.

या शिवाय पाणी पुरवठा समिती वाट्याला आल्यामुळे प्रस्तावित दुधगंगा योजनेला अधिक गती देण्याची जबाबदारी आता आमदार आवाडे यांच्यावरच अधिक आली आहे. तर विविध कारणांने चर्चेत असणाऱ्या आरोग्य समितीच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याची संधीही आवाडे गटाला मिळाली आहे.  (local news)

राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख मदन कारंडे यांनी दाखविलेला राजकीय (politics) समजुतदारपणा अत्यंत कामी आली. यावेळी सत्तेतून बाहेर ठेवले जाण्याची शक्‍यता असतांनाही त्यांनी राजकीय कौशल्य पणाला लावत सत्तेतील सहभाग कायम ठेवला. एकेकाळी राष्ट्रवादीतील जांभळे गटाकडे असणाऱ्या बांधकाम समिती यावेळी आपल्या गटाकडे ठेवण्यात कारंडे गटाला यश आले. प्रचंड अस्थीर राजकीय वातावरण असतांनाही माजी आमदार हाळवणकर यांची संयमी भूमिका फायद्याची ठरली.

या सर्व घडामोडीत आरोग्य समितीवर पाणी सोडावे लागले असले तरी अन्य दोन समित्या आपल्याकडे घेण्यात त्यांना यश आले. यामध्ये त्यांचा फायदा की तोटा झाला, याचा अर्थ वेगवेगळा लावू शकला जातो. पण त्यांची अल्पमतात येणारी सत्ता या डावपेचामुळे वाचली. त्यामुळे परिस्थीतीप्रमाणे तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या तडजोडीच्या निर्णयामुळे सत्ता कायम राहिली.