chandrakant patil
politics news of maharashtra- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये (election result) म्हणजेच खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा पराभव झालाय. हा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच भाजपासाठीही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मात्र पाटील यांनी हा पराभव म्हणजे आपला पराभव असल्याचा दावा फेटाळू लावला आहे. 

एक खानपूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी पहिली प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या पराभवानंतर टीव्ही ९ मराठी या वृत्ताविहीनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अगदी थोड्या मतांनी आम्ही खानापूरमध्ये पराभूत झाल्याचे म्हटले आहे. तसचे पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नसून महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे,” असंही म्हटलं आहे.

खानापूरमध्ये सहापैकी तीन जागा आम्हीच जिंकल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. दोन जागांवर आमचा अगदी कमी मतांनी पराभव झाल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पराभव झाला असला तरी आम्हाला गावातील जनतेनं दिलेला कौल मान्य (election result) असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांनी म्हटलं (politics news of maharashtra)आहे.

-------------------------------------

Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------

याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवरही टीका केली आहे. राज्यातील सरकार हे तीन पक्षांचं कडबोळं सत्तेत आहे. मी सुरुवातीपासून चारही पक्षांनी स्वबळावर लढावं, मग पाहा आण्ही नंबर वनला असू असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केलाय. तसेच राज्यातील सध्याच्या सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही असा टोलाही त्यांनी लगावाल आहे. ग्रामपंचायतीत जिंकल्याने जिकलो असं होतं नाही. एखाद्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आल्यानंतर ती ग्रामपंचायत जिंकल्याचं म्हटलं जातं. संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीचं चित्र अधिक स्पष्ट होईल तेव्हा आमचीच संख्या जास्त असेल असा विश्वासही पा maharashtra-gram-panchayat-election-results-chandrakant-pa टील यांनी व्यक्त केलाय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. 

मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे.

खानापूरमधील सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं.