married liferelationship आनंदी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी (married life) चांगला जोडीदार भेटणे आवश्यक असते. त्यामुळेच आपला जीवनसाथी आपल्यासाठी सुयोग्य असेल का? याची चिंता चिंता अनेकांना लागलेली असते. त्यामुळेच आपला विवाह अशा व्यक्तीशी व्हावा जी आपल्या भावना, मान-सन्मान आणि सुखांची काळजी घेईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.

बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत गुणांची परख करा

चाणक्य सांगतात की, जीवनसाथी निवडताना त्याच्या काही गुणांची परख केली पाहिजे. व्यक्तीचे बाह्य सौंदर्य हे खरे सौंदर्य नसते. व्यक्तीचे मन आणि त्याचे विचार सुंदर असले पाहिजेत. त्यामुळे बाह्य सौंदर्य पाहून विवाह करणारी व्यक्ती संकटात सापडू शकते. तर अंतर्गत सौंदर्याची परख करून जोडीदाराची निवड करणारी व्यक्ती सुखी राहते.

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

संस्कार

विवाहापूर्वी जोडीदारावरील (married life) संस्कारांचीही माहिती घेतली पाहिजे. संस्कारच व्यक्तीला मान-सन्मान मिळवून देण्यात मदत करतात. संस्कारी जोडीदार घराला स्वर्ग बनवू शकतो. तसेच मुलांवरही चांगले संस्कार करून त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो.

धार्मिकता

धार्मिकदृष्टीने मर्यादित असलेली व्यक्ती साधारणपणे खूश राहते. आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या धर्म-कर्मावरील विश्वास आणि मर्यादेची माहिती घेतली पाहिजे. मर्यादेत राहणारी व्यक्ती कधी चुकीचे काम करू शकत नाही.

धाडसी व्यक्तीमत्त्व

धैर्यवान मनुष्य बिकट परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे चाणक्य विवाह करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या जोडीदारामधील (relationship) धैर्यशीलतेची परख करावी, असा सल्ला देतात. विशेषतः स्रीमध्ये धैर्यशीलता असणे आवश्यक मानले गेले आहे. जर महिला धैर्यवान असेल तर ती कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यात सक्षम असते.

रागीट स्वभाव नसावा

रागीट स्वभावाची व्यक्ती कधीच सुखी आणि यशस्वी होऊ शकत नाही. यश आणि सुखी संसार करण्यासाठी शांत स्वभाव असणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत जर दोघांपैकी एकाला प्रत्येक बाबतीत राग येत असेल तर त्याच्यासोबत सुखी जीवनाची कल्पना करता येऊ शकत नाही. त्यामुळे जोडीदार निवडताना तो रागीट स्वभावाचा नाही ना याची माहिती करून घ्या...