WhatsApp and facebook

किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (Confederation of All India Traders) सरकारला इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि फेसबुकवर (Facebook) बंदी आणण्याची मागणी केली आहे. कॅटने (CAIT) माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांना पत्र (privacy policy) लिहून ही मागणी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसी -

कॅटने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत (privacy policy) चिंता व्यक्त करत, ही नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखण्याचं किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पूर्णपणे बंदी आणण्याचं म्हटलं आहे.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

देशाच्या सुरक्षेसाठी धोका -

कॅटने पत्रात लिहिलं की, सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला नवी पॉलिसी (privacy policy) लागू करण्याबाबत थांबवावं किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी आणावी. भारतात फेसबुकचे 20 कोटीहून अधिक युजर्स आहेत आणि प्रत्येक युजरच्या डेटापर्यंत पोहचण्यासाठी सक्षम केल्यास, केवळ अर्थव्यवस्थाच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

काय आहे WhatsApp ची नवी पॉलिसी -

व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सचा डेटा कसा प्रोसेस आणि तो फेसबुकशी कसा शेअर करणार हे सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवण्यासाठी युजर्सला नवी पॉलिसी (New Terms and Policy) मान्य करावी लागेल.