telecom company bsnl

टेलिकॉम क्षेत्रातील (telecom company) विविध कंपन्या नववर्षानिमित्त वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडलाही (BSNL) टिकून राहण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्या लागतात. बीएसएनएलनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची भेट म्हणून एका योजनेला मुदतवाढ दिली आहे. 

बीएसएनएल (BSNL) फॅमिली – Free SIM offer ही ऑफर आधीपासून सुरू होती. तिला मुदतवाढ देऊन ती 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीने तमिळनाडू साठीच्या कंपनीच्या वेबसाईटवर ही योजना जाहीर केली आहे. म्हणजे आता 31 जानेवारीपर्यंत ग्राहकांना बीएसएनएलचं कार्ड मोफत मिळू शकेल.

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

या योजनेत नवीन कार्ड घेऊ इच्छिणारा किंवा पोर्ट होऊन आलेला ग्राहक दोघांनाही सिमकार्ड मोफत मिळेल. सामान्यपणे बीएसएनएलचं कार्ड 20 रुपयांना मिळतं पण या योजनेत ते मोफत मिळेल. त्यामुळे ग्राहक या योजनेचा आनंद लुटू शकतील. नवीन वर्षाची ही भेट ग्राहकांना आवडेल अशी बीएसएनएलला आशा आहे.

ग्राहकांना नवीन योजना (telecom company) देण्याच्या हेतूने बीएसएनएलने 1 नोव्हेंबरला ही योजना सुरू केली होती ती 28 नोव्हेंबरपर्यंतच होती पुढे ती वाढवून 1 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ती वाढवून 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कुणीही ग्राहक या सिमकार्डसाठी अर्ज करू शकतं. एक अट मात्र आहे की हे सिम घेतल्यावर तुम्हाला त्यावर पहिलं 100 रुपयांचं फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) रिचार्ज करणं बंधनकारक आहे.

दोन व्हाउचरमध्ये केला बदल

बीएसएनएल (BSNL) तमिळनाडू सर्कलमध्ये 186 आणि 199 च्या व्हाउचरमध्ये बदल करण्यात आले असून ते 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहेत. 186 रुपयांच्या व्हाउचरची किंमत आता 199 करण्यात आली असून ते 28 दिवसांऐवजी 30 दिवस वैध असेल. या व्हाउचरमधील इतर सगळ्या सुविधा तशाच मिळणार आहेत. 199 रुपयांचं टेरिफ व्हाउचर 201 रुपये केलं असून त्याची वैधता किंवा सुविधा वाढवलेल्या नाहीत.