fashion show ramp walk
entertainment news- फॅशन शोशी (fashion show) संबंधित असलेली सर्वात मोठी भीती म्हणजे मॉडेल्सचे Oops Moment चा सामना करावा लागणे आणि दुसरे म्हणजे चालता-चालता रॅम्पवरच पडणे. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट जरी घडली तरी फॅशन शो, आउटफिट्सव्यतिरिक्त याच घटनांवर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अधिक चर्चा पाहायला मिळते. फॅशन शोशी संबंधित असे अपघात काही ठरवून घडवले जात नाहीत, पण हे क्षण मॉडेल आणि डिझाइरनसाठी अतिशय लाजिरवाणे ठरतात.

बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील बऱ्याचदा फॅशन शोमध्ये सहभागी होतात, काही अभिनेत्रींसोबतही असेच काहीसे किस्से घडले आहेत. रॅम्पवर (ramp walk) चालता-चालता अभिनेत्री खाली पडल्याच्या घटनांबाबत सांगायचे झाले, तर या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना सुद्धा अशा घटनेचा सामना करावा लागला होता.

तोल जाऊन पूनम ढिल्लन खाली पडल्या

पूनम ढिल्लन एका फॅशन शोमध्ये (fashion show) सहभागी झाल्या होत्या. या दरम्यान त्यांनी देखील अन्य मॉडेल्स प्रमाणेच पारंपरिक पेहराव परिधान केला होता. या अभिनेत्रीने सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीवर सीक्वन वर्क करण्यात आलं होतं. साडीवर त्यांनी सुंदर ईअररिंग्स आणि मॅचिंग मांगटिका असे दागिने देखील परिधान केले होते. या अवतारामध्ये त्या अतिशय मोहक दिसत होत्या. मॉडेल्सनंतर पूनम ढिल्लन यांची रॅम्प वॉक करण्याची वेळ आली, यावेळेस त्यांचा पाय साडीमध्ये अडकला आणि तोल जाऊन त्या खाली पडल्या.

--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------

या घटनेतून स्वतःला सावरत पूनम ढिल्लन यांनी अतिशय शानदार आणि आत्मविश्वासाने रॅम्प वॉक पूर्ण केलं. चेहऱ्यावर मोठे हास्य आणत त्यांनी आपली साडी नीट केली आणि आत्मविश्वासाने रॅम्प वॉक पूर्ण केलंच. ज्या पद्धतीने पूनम यांनी ही परिस्थिती हाताळली, त्याबाबत त्यांचे प्रचंड कौतुक देखील करण्यात आलं.

हील्समध्ये सोनाक्षीचाही ड्रेस अडकला होता

सोनाक्षी सिन्हा सोबतही अशीच काहीशी घटना घडली होती. फॅशन वीकमध्ये अभिनेत्रीला शो स्टॉपर बनवण्यात आले होते. ग्लॅमरस गोल्डन गाउन परिधान करून तिनं रॅम्प वॉक करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिचा ड्रेस हाय हील्समध्ये अडकला. यामुळे सोनाक्षीचा तोल गेला. पण हसतमुखाने तिनं या परिस्थितीचा सामना केला आणि आत्मविश्वासाने रॅम्प वॉक (ramp walk)  पूर्ण केलं. हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचं कौतुक केलं. (entertainment news)

पडता-पडता थोडक्यात वाचली यामी गौतम

यामीने लॅक्मे फॅशन शोसाठी सुंदर टूल मेड रफल गाउन परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. शो स्टॉपर म्हणून तिनं वॉक करण्यास सुरुवात केली, पण अचानक तिचा तोल गेला आणि ती पडता-पडता वाचली. यामीने देखील या घटनेचा आत्मविश्वासाने सामना करत रॅम्प वॉक पूर्ण केलं.