the-whole-family-committed-suicide-in-belanki-of-miraj

(Suiside) मिरज तालुक्यातील बेळंकी येथे सेवानिवृत्त पोलिस हवालदारासह घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अण्णासो गव्हाणे (वय ६५), मालन अण्णासो गव्हाणे ( ५५) आणि मुलगा महेश अण्णासो गव्हाणे (३०) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

मुलाने शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून वाढलेल्या कर्जातून कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान, गव्हाणे यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून, कर्जाच्या वसुलीचा तगादा लावलेल्या १३ जणांची नावे त्यात आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दोन चिमुकल्यांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला

मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आत्महत्या प्रकरणाने दु:खाचे सावट पसरलेले असतानाच कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथेही एक दुर्दैवी घटना घडली. (Suiside) येथे दोन चिमुकल्यांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळण्याची घटना घडली. दोन मुलांपैकी एका मुलाला वाचविण्यात यश आले, तर दुसरा मुलगा अजूनही विहिरीतच आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली दुर्दैवी घटना. गुरुनाथ बंडू माळी (वय ६) हा मुलगा बचावला, तर त्याचा भाऊ श्रीकांत बंडू माळी (वय ३) याचा अद्याप शोध सुरू.