maratha reservationअशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील (maratha reservation) वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार (central government) मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत. चंद्रकांत पाटील आज नवी दिल्ली दाखल झालेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

विधान परिषद निवडणुकीमध्ये (assembly election) महाविकास आघाडी सरकारने यंत्रणा कशी वापरली, याची माहिती पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद सोमवारी घेणार असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलंय. जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौरा करणार होते, परंतु तो दौरा रद्द असल्याने सर्व माहिती दिलीय. औरंगाबादचं संभाजी नगर नाव करावे, यासाठी आमचा संघर्ष कायम राहील. सरकारने तसा प्रस्ताव आम्हाला दिल्यास आम्ही नाव बदलू, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केलंय.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

तत्पूर्वी मराठा आरक्षणावरील  (maratha reservation) स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाला संवैधानिक संरक्षण देण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यालाच आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाची 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची आणि वकfलांची 11 तारखेला दिल्लीत वकीलांची बैठक आहे. मी स्वतः त्या बैठकीला दिल्लीत जाणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीतील सहकारीही या बैठकीला हजर राहतील.राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे यासाठी केंद्र सरकराचे (central government) सहकार्य अपेक्षित आहे. मागील सुनावणीत अटर्नी जनरलला नोटीस काढण्यात आलेली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले होते