collectors-wallet-beaten-at-mlas-daughters

कोरोनामुळे आधीच राज्य सरकार (
State governmentचिंतेत आहे. त्यात आता बड्या मंत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लग्नात चोरीची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ मोठे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

मंत्री व अधिकारी असल्याने मोठी सुरक्षा व्यवस्था आलीच. अशाही परिस्थितीत एका भामट्याने लग्नसोहळ्यात जाऊन थेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं पाकीट मारलं. याच लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यासह अनेक प्रमुख राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात पोलिसांचाही मोठा वावर होता. तरीही जिल्हाधिकाऱ्यांना चोरट्यांनी हिसका दाखवला.

चोरट्यांनी लग्नात गोंधळ घातलाच, त्याशिवाय येथे मोठी गर्दी झाल्याने कोरोना नियमांची पायमल्ली झाली. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांची हजेरी लावली होती. मात्र मोठ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्ज़ा उडाला. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये पार पडला विवाह सोहळा पार पडला होता.