elections-post-chairperson-various-subjects

(Ichalkaranji Politics) येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी बुधवारी (ता. 6) श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहेत. याबाबत आदेश आज जिल्हाधिकारी (Collector) दौलत देसाई यांनी दिला. यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेतील विद्यमान सत्ता कायम राहणार की फेरबदल होणार याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. 

विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची एक वर्षाची मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन निवडीचा कार्यक्रम कधी लागणार आहे, याकडे लक्ष लागले होते. आज याबाबतचा कार्यक्रम जिल्हाधिकारी देसाई यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना गती आली आहे. 6 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडीची प्रक्रिया चालणार आहे. प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी होणार आहेत. 

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

दरवर्षी पालिका सभागृहात निवडीची प्रक्रिया होत होती. मात्र यंदा कोरोनाच्या नियमावलीमुळे निवडीचे ठिकाण बदलले आहे. पालिकेच्या (Ichalkaranji Politics) श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ही निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. निवड प्रक्रियेसाठी होणारी सभा ही ऑफलाईन होणार आहे. याबाबतचा आदेश आज पालिका प्रशासनाला प्राप्त झाला. 

निवडीचा कार्यक्रम असा 
सकाळी 11 ते 1 - विषय समिती व स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे 
दुपारी 1 ते 3 - विषय समिती सभापतीपदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे 
दुपारी 3 ते 3.30 - नामनिर्देशने पत्रांची छाननी व प्रकटन करणे 
दुपारी 3.30 ते 4.00 - नामनिर्देशील पत्रे मागे घेणे व शिल्लक पत्रांचे प्रकटन करणे 
दुपारी 4.00- विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक घेऊन निकाल जाहीर करणे. स्थायी समितीची निवड करणे.