d-b-squads-dismissed-decision-district-superintendent-police

(police stationजिल्ह्यातील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याने जिल्ह्यातील अकरा डी. बी. (गुन्हेशोध पथके) (Crime squadsपथके जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज बरखास्त केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे एकमेव पथक कायम ठेवण्यात आले. हद्दीतील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, अवैध धंदे शोधणे, वेळेत तपास किंवा संभाव्य गुन्हे रोखणे, यासाठी या पथकांची स्थापना आहे.

जिल्ह्यातील अशा १२ पथकांना बलकवडे यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. हद्दीतील अवैध धंदे मोडून काढा, चेन स्नेचिंगसह मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यावर भर द्या, असे बजावले होते. त्यांनी सर्व पथकांचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे डी. बी. पथक वगळता इतर सर्व पथके अपयशी ठरल्याचे पुढे आले. याबाबत बलकवडे यांनी नाराजी व्यक्त करत अपयशी पथके बरखास्त केली. त्यांनी या डी. बी. पथकांची तातडीने पुनर्रचना करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. नव्याने स्थापन होणाऱ्या डी.बी. पथकासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून ती उप अधीक्षक व निरीक्षकांना देण्यात आली. (police station

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

पथकासाठी नियमावली

 वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढा
 नव्या, तरुण चेहऱ्यांना संधी द्या 
 इच्छुकांची यादी प्रभारी अधिकाऱ्यांकडून उपअधीक्षकांकडे पाठवावी
परीक्षा द्यावी लागणार
 डीबी पथकात वर्णी लागण्यासाठी आता परीक्षा द्यावी लागणार 
 उपअधीक्षकांकडून परीक्षा घेतली जाणार
 डी. बी. पथकात वा एलसीबीमध्ये दोन वेळा कर्तव्य बजावलेल्या पोलिसांना संधी नाही
 इच्छुकाला हद्दीची संपूर्ण माहिती, रेकॉर्डवरील गुन्हेगार, त्यांच्या पद्धती, काळे धंदेवाल्यांसह संवेदनशील ठिकाणे यावर आधारित परीक्षा
 पोलिसांचे रेकॉर्ड स्वच्छ असावे, असाही निकष