
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार धोनीने रैनासोबत चर्चा केली आणि त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण तरीही रैना ऐकला नाही. धोनी आणि रैना यांची मैत्री सर्वश्रुत आहे. ज्यादिवशी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याच दिवशी काही मिनिटांच्या आतच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलं.
----------------------------------------
Must Read
1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!
2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा
3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले
4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!
5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा
----------------------------------------
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रैनाने धोनीसोबतच्या मैत्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी आणि धोनीची मैत्री वेगळ्या प्रकारची आहे. आम्ही भारत आणि चेन्नईसाठी बऱ्याच मॅच जिंकल्या.(Sports News) मी आणि धोनी लवकरच भेटू. आमची पार्टनरशीप पुन्हा सुरू होईल. गोष्टी योग्य होतील आणि मला अपेक्षा आहे की सगळं काही योजनेनुसार होईल,' असं रैना म्हणाला.
15 ऑगस्ट 2020 साली 7 वाजून 29 मिनिटांनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर काही मिनिटांमध्येच रैनानेही आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडत असल्याचं जाहीर केलं.