young-man-from-bengalure-karnataka-reached-lakhimpur

(Girlfriend) सलमानने मोठ्या पडद्यावर अनेक रोमॅंटिक चित्रपट (Romantic Movies) गाजवले. पण खऱ्या खुऱ्या आयुष्यातला हा सलमानही पडद्यावरील सलमानइतकाच रोमँटिक आहे. त्याने कधीही न पाहिलेल्या गर्लफ्रेंडसाठी टेडी (Teddy) आणि चॉकलेट (Chocolate) घेऊन बंगळुरूहून (Banglore) थेट लखनऊ (Lucknow) गाठलं आहे.  गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडा झालेेला हा सलमान कर्नाटकाच्या देवराया जिल्ह्यातील ठाणा गौरीबाजारचा रहिवासी आहे. त्याचं पूर्ण नाव सलमान अन्सारी असून तो सध्या बंगळुरूमध्ये एसी मेकॅनिकच काम करतो.

सात महिन्यांपूर्वी कर्नाटकातील सलमान अन्सारीची सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून (Social Media App) उत्तर प्रदेशातील लखीमपूर शहरातील एका 17 वर्षीय मुलीशी ओळख झाली. दोघेही मेसेजच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक शेअर केले आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. या 7 महिन्यांच्या टेलिफोनिक मैत्रीनंतर युवकाने या  मुलीला भेटायचे ठरवले.

त्यानंतर त्याने त्याच्या मित्रासह विमानाने बंगळूरहून थेट लखनऊ गाठलं आणि नंतर बसने मुलीच्या गावी लखीमपूरला गेला. त्यानंतर मुलीच्या घरी पोचून त्याने त्या (Girlfriend) मुलीला टेडी बेअर, चॉकलेट आणि मिठाईचा बॉक्स देण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, मुलीच्या कुटुंबाने सलमानला पकडले. नंतर जवळपासचे लोकही घटनास्थळी पोहोचले. लोकांनी सलमानला त्याने केलेल्या हेरोगिरीसाठी चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. सलमानकडून पोलिसांना 1600 रुपये रोकड आणि 11 जानेवारीचे विमानाचे तिकिटे मिळाले.सध्या रिपोर्ट  दाखल करून आरोपीं सलमानवर कारवाई सुरु आहे .