awful-deep-wounds-on-the-private

(Crime) राजधानी रांचीच्या ओरामांझी भागात तरुणीचा शिर कापलेल्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह (Corpsesआढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस मुलीबाबत माहिती शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओरामांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुच्चू पंचायतीच्या जिराबारमधील साई नाथ विद्यापीठामागील पारस पात्रा जंगलात हा मृतदेह सापडला. मृतदेह नग्न अवस्थेत होता आणि शिर कापलेलं होतं. तरुणीचं वय 20 ते 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

जंगलात मुलीचा मृतदेह पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस डॉग स्क्वॉड आणि एफएसएल पथकांसह घटनास्थळी पोहोचले व तपास केला. परंतू पोलिसांना याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. हरवलेले डोकं अद्याप सापडलेले नाही. यामुळे मुलीची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी टीमचं गठण

रामिन एसपी नौशाद आलम यांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास केला. (Crime) ते म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक केली जाईल. घटनेच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. ही घटना दुर्दैवी आहे.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

प्रायव्हेट पार्टवर दुखापतीच्या खुणा

तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात टाकण्यात आला. मात्र, पोलीस याबाबत खुलेपणाने बोलत नाहीत. त्याचवेळी स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्या भागातील एकही मुलगी हरवली नाही. तर मुलगी बाहेरच असावी, अशी शक्यता आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा असल्याचे आढळले. तरुणीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.