
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. औरंगाबादसाठी बुधवारी पहाटे पुण्याहून लस घेऊन वाहन सकाळी ९ वाजेच्या सुमारास लस शहरात दाखल झाले. औरंगाबादेत लस दाखल झाल्यानंतर या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात या लसी ठेवण्यात आल्या आहेत. (Coronaviruse) औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लस दाखल झाल्या. तसेच लातूर आरोग्य उपसंचालक विभागासाठीही लस दाखल झाल्या.
--------------------------------------------------
Must Read
1) कृषी कायद्याच्या निकालावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
2) वाहतूक समस्या सोडविण्यासाठी इचकरंजीत व्यासपीठ
3) 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, मंत्री धनंजय मुंडे
--------------------------------------------------
आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोल्ड रुम
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यात कोल्ड रुमचे युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहायक संचालक डॉ. प्रदीप मुरंबीकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते या कोल्ड रुमच्या कामाची पाहणी केली होती.