
(Coronaviruse) दोन दिवसांपूर्वी राज्यात पन्नासच्या खाली गेलेला कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता पुन्हा पन्नासीवर पोहोचला आहे. दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या (maharashtra coronavirus) मंगळवारच्या (12, सप्टेंबर 2021) आकडेवारीनुसार, राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54% आहे.
दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आता एकूण मृत्यूची संख्या 50,151 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पन्नासपेक्षा जास्तच होता. हा आकडा दोन दिवसांपूर्वीच चाळीसपेक्षाही खाली गेला होता. पण पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
--------------------------------------------------
Must Read
1) कृषी कायद्याच्या निकालावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
2) वाहतूक समस्या सोडविण्यासाठी इचकरंजीत व्यासपीठ
3) 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, मंत्री धनंजय मुंडे
--------------------------------------------------
राज्यातील 12, सप्टेंबर 2021 कोरोना रुग्णांची आकडेवारी (Coronaviruse)
राज्यातील एकूण कोरोना रुग्ण - 19,74,488
उपचार घेत असलेले रुग्ण - 51,892
दिवसभरात नव्या रुग्णांची नोंद - 2,936
दिवसभरात बरे झालेले रुग्ण - 3,282
एकूण बरे झालेले रुग्ण - 18,71,270
रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) - 94.77%
दिवसभरातील मृत्यू - 50
एकूण मृत्यू - 50,151
राज्यातील मृत्यू दर - 2.54%
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 11 रुग्ण
यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे महाराष्ट्रात 11 रुग्ण आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 2 आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे. दरम्यान मुंबईत गुजरात आणि गोव्यातील प्रत्येकी एका रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.