bollywood-actor-varun-dhawan-and-fashion-designer-natasha-dalal

(Married) फॅशन डिझाइनर नताशा दलाल (fashion designer Natasha Dalal) ही उत्कृष्ट फॅशन डिझाइनर्सपैकी एक आहे. तिचं नाव विविध सर्च इंजिन्स आणि सोशल मीडियावर सतत ट्रेंडमध्ये असतं. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याशी ती लगीनगाठ बांधते आहे.

वरुन धवन (Varun Dhawan) सोशल मीडियावर (Social media) सतत सक्रिय असते. तुलनेनं नताशा मात्र या मंचांवर कमीच असणं पसंत करते. आता नुकतीच वरुननं त्याच्या नताशासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. 'कॉफी विथ करन' (Coffee  with Karan) या शोमध्ये त्यानं आपण नताशासोबत प्रेमात असल्याची कबुली दिली. त्यानंतर ही जोडी सार्वजनिक ठिकाणी आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसली.

वरुन आणि नताशा हे दोघं शाळेत एकमेकांचे वर्गमित्र (school freinds) होते. आजवर त्यांनी आपल्या नात्याचं खासगीपण कमालीचं जपलं होतं. शिवाय त्यांनी या नात्याची वाच्यता कुठेच केली नव्हती. आता मात्र वरुनच्या चाहत्यांना (fans) नताशाबद्दल जाणून घ्यायचं आहे. नताशा व्यवसायानं फॅशन डिझायनर आहे. न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून नताशानं फॅशन डिझायनिंगची डिगरी घेतली आहे. (Married) भारतात परतल्यावर 2013 मध्ये तिनं आपला ब्रँड (brand) नताशा दलाल लेबल सुरू केला. सेमी फॉर्मल आणि फॉर्मल ड्रेसेस या लेबलखाली ती बनवते. लग्नसमारंभातील पोशाख हीसुद्धा तिच्या ब्रँडची खासियत आहे.

वरुन आणि नताशा अलिबाग इथं होणाऱ्या एका सुंदर सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत. लग्नाचे इतर विधी सुरूही झाले आहेत. नताशा आणि वरुनचे कुटुंबीय, फिल्ममेकर शशांक खेतान, कुणाल कोहली, वरुनची पुतणी अंजली धवन, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हेसुद्धा अलिबागच्या सोहळ्यात उपस्थित आहेत. लग्नाच्या दिवशी इतरही अनेक सेलिब्रिटीज येणार आहेत. लग्नासाठी एक मोठं रिसॉर्ट बुक केलं गेलं आहे. 24 जानेवारीला लग्न आणि 26 जानेवारीला रिसेप्शन असणार आहे.