chandrakant-patil-graduate-election-result-ncp-congress

(EVM) पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासनाने घपले केले आहेत. तीनशे बुथवर शेवटच्या तासात 130 मतदान झाले. वास्तविक एवढ्या कालावधीत केवळ 30 ते 35 मतदान होऊ शकते. मराठवाड्यामध्ये 5 हजार मतपत्रिका कोऱ्या सापडल्या आहेत. या गोष्टी पुढील काही दिवसात पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. याबाबतची याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ईव्हीएम का नको ते स्पष्ट होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patilयांनी केले. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुंबईत दोन दिवसात भाजपच्या सुकाणू समितीची बैठक झाली. यामध्ये भाजपच्या आगामी उपक्रमांची रुपरेषा ठरवण्यात आली. या सर्वाची माहिती देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधान परिषदेच्या पराभवामुळे ग्रामपंचायत निवडणूकही तुम्ही गांभिर्याने घेत आहात का ? या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, ""ग्रामपंचायतच काय पण आम्ही विकास सोसायटीची निवडणूकही गांभिर्याने घेतो. पदवीधर निवडणुकीत आमच्या पराभवाची जी काही कारणे आहेत त्यामध्ये प्रशासनाकडून करण्यात आलेले घपले हेदेखील आहे. पदवीधरची एक मतपत्रिका भरून मतपेटीत टाकण्यास कमीत कमी 3 मिनिटे लागतात. मात्र पदवीधरच्या नऊशेपैकी तीनशे बुथवर शेवटच्या एका तासात 130 ते 135 मतदान झाले आहे. हे कसे शक्‍य झाले. मराठवाड्यात 5 हजार मतपत्रिका कोऱ्या सापडल्या. यासह अन्य काही प्रकार घडले आहेत. पुढील काही दिवसांत (EVMपुराव्यासह ते सिद्ध करणार आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार आहे. यानंतर कॉंग्रेस-राष्ट्ररवादीला ई.व्ही.एम का नको ते स्पष्ट होईल.''  

---------------------------------------

Must Read

1) खाणीमध्ये आढळून आलेल्या यूवकाचा खून

2) इचलकरंजीत सभापती निवड बिनविरोध

3) Marathi Joke : नवरा आणि बायको

---------------------------------------

खानापूरचे माहिती नाही 
खानापूर (ता. भुदरगड) चंद्रकांत पाटील यांचे गाव आहे. या ग्रामपंचयत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांनी शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता. ते म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष, चिन्ह नसते. गावातील लोकांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची असते. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना केवळ बळ देण्याचे काम करतो. त्यासाठी प्रवास करतो; पण सध्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही.''