eds-new-information-about-shiv-sena-mp-sanjay-rauts-wife

(Politisc News) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena mla sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (varsha raut) यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) समन्स बजावला होता. आता या प्रकरणी ईडीने नवीन खुलासा केला आहे.

एनएआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी 5625 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण 12 लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला आहे.

तर दुसरीकडे पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची  72 कोटी रुपयांची संपत्ती  ईडीने जप्त केली आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा ईडीने केला आहे.

काय आहे प्रकरण?

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.

वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले.  (Politisc News) प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली.  प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच  हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.

विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे.

संजय राऊत यांचा खुलासा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ईडीच्या नोटिसीबद्दल स्पष्टीकरण दिले होते. 'माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घराती मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे' असा आरोप करत राऊत यांनी खुलासा केला होता.