gold-smuggling-from-chucky-underwear-after-the-investigation

(Smuggling of gold) देशातील वाढतं क्राईम (Crime) ही चिंता वाढवणारी बाब आहे. कस्टम विभागाचे कर्मचारी दक्षता पाळत असले तरी आरोपी नव नव्या प्रकारे तस्करी करीत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच तामिळनाडूच्या कस्टम विभागाने केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यानी 31 लाखांचं सोन नेणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

हा आरोपी 31 लाखांचं सोनं चक्क अंडरवेअर मधून घेऊन जात असल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूच्या कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा आरोपी 621 ग्रॅम सोने दुबई मधून आणल्याचे उघड झाले आहे. सोन्याने भरलेले दोन पाऊच प्रवाशाने अंडरवेअरमध्ये ठेवले होते. (Smuggling of goldही अनोखी तस्करी पाहून कस्टम विभागाचे अधिकारीही चक्रावले. संशयित व्यक्तीला चेन्नई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान अद्यापदी देशावर कोरोनाचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोना लशीची प्रतीक्षा आहे. भारतीय औषध कंपनी भारत बायोटेक (bhart biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (serum institute of india) ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या मदतीनं तयार केलेली कोविशिल्ड (covisheild) या दोन कोरोना लशींना भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मोदी सरकारनं कोव्हिशिल्ड लशीला प्राधान्य दिलं आहे आणि स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिन ही गरज पडल्यासच दिली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र स्वदेशी कोरोना लशीची गॅरंटी मोदी सरकारनं दिली आहे.