सन २०२० मध्ये शेअर बाजाराने (stock market) अनेक चढ-उतार बघितले असले तरी वर्षाचा अखेरचा दिवस मात्र फारशी वाढ वा घट न होता गेला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने गाठलेला १४ हजार अंशांचा टप्पा तसेच सेन्सेक्स आणि निफ्टीने केलेले नवीन उच्चांक हे गुरुवारचे वैशिष्ट्य ठरले.
-----------------------------------------
Must Read
1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त
2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?
3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा
4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस
5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल
-----------------------------------------
अनेक उतार-चढाव बघितलेल्या या वर्षामध्ये निर्देशांकांनी सुमारे १५ टक्के परतावा दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली. मात्र त्यानंतर तो ही खाली आला. दिवसअखेर हा निर्देशांक ५.११ अंशांनी वाढून ४७,८९६.९७ अंशांवर बंद झाला.