Nitesh Raneदेवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीतील (election) सर्व सदस्य भाजप पुरस्कृत असून त्यांची बिनविरोध निवड झाली. सदस्यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायत आता भाजपकडे आली आहे. निवडणुकांचे फड रंगण्याआधीच भाजपने महाविकास आघाडीला धक्का (election application) दिला. मोंडपार ही सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे.

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

विजयी सदस्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांची आज कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आमदार राणे यांनी सर्व सदस्यांचे आणि तेथील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

मोंडपार ही बिनविरोध झालेली जिल्ह्यातील चौथी ग्रामपंचायत आहे. याआधी कणकवली तालुक्यातील गांधीनगर आणि वैभववाडी तालुक्यातील मांगवली या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या (election application) दिवशी देवगड तालुक्यातील रहाटेश्वर आणि मोंडपार या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. अशाप्रकारे जिल्ह्यातील चार ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्या आहेत.