raan gavaहातकणंगले तालुक्यातील किणी येथे वस्तीत पहाटे दोन गव्यांनी दर्शन दिल्याने किणी, घुणकी, वाठार,तळसंदे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. (forest department)

पुणे-बंगळूर महामार्गावरील (highway) किणी येथे अजित नेमगोंडा पाटील यांची घरापाठी मागील बाजूस जुन्या हायवेलगत रिकामी जागा आहे. इथे चिंचेच झाड व शेजारी छोटा आड आहे. दोन गवे  नवीन व जुना हायवे पार करून किसान पाणी पुरवठ्या नजीकच्या ऊस शेतीतून आले.  

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

दरम्यान किणी येथील संजय चाळके हे पुण्याहून गावी परत आले असताना त्यांच्या मोटारी समोरुन  दोन्ही गवे अजित पाटील यांच्या जागेत गेले. एखाद्या शेतकऱ्यांची जनावरे असावीत या भावनेतून  चाळके यांनी शेजारच्या नागरिकांना माहिती दिली. पण ते गवे असल्याचे निदर्शनास आले. चिंचेच्या झाडाखाली काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर  ज्या मार्गाने गवे आले त्याच मार्गाने ऊस  तोडणी झालेल्या शेतातून तळसंदे गावच्या दिशेने गेल्याचे नागरीकांनी सांगितले.

वनविभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली.  त्यांनी चौकशी सुरू केली आहे.  नरंदे वनविभागाचे वनरक्षक (forest department) ईश्वर जाधव, वनसेवक पी.एन.खाडे यांनी पाहणी केली.गव्यांचा भ्रमण काळ असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना  दोनहून अधिक शेतकऱ्यांनी काठी आणि रात्री बँटरी घेऊन जावे. गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये.ते बिथरण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडणी मजूर वाहन रात्री आल्यानंतर ऊस वाहन भरण्यासाठी शेतात जातात. तसेच भारनियमनामुळे आठवड्यातील काही दिवस शेतातील विजपुरवठा रात्री सुरू असतो.पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात असतात.