bihar-crime-news-indigo-state-manager-killed

(Crime) बिहारची राजधानी पाटणामध्ये (Patna) मंगळवारी रात्री भर बाजारात इंडिगो (Indigo) कंपनीचे स्टेट हेड रुपेश सिंह (Rupesh Singh) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रुपेश ऑफिसमधून घरी परतत होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात रुपेश गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

घराबाहेरील CCTV खराब?

मोटारसायकलवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी रुपेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर आली आहे. रुपेश सिंह हत्याकांडाच्या तपासासाठी CCTV ची मदत घेतली जाणार असल्याचं पाटणा पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र रुपेश राहत होते, त्या घराच्या बाहेरील CCTV गेल्या 2 वर्षांपासून खराब आहे, असं वृत्त ‘आजतक’ नं दिलं आहे. CCTV चं योग्य फुटेज न मिळाल्यास त्यांच्या हत्याकांडाच्या तपासात अडचणी येऊ शकतात.

रुपेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. ते काही दिवसांपूर्वी परिवारासोबत गोव्यात सुट्टीवर गेले होते. दोन दिवसांपूर्वीच ते पाटणामध्ये परतले होते.

निवडणूक लढवण्याची होती ऑफर

बिहारमधील छपराचे रहिवासी असलेले रुपेश पाटाणामधील सामाजिक कामांमध्ये आघाडीवर होते. सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत त्यांचे फोटो आहेत. (Crime) रुपेश यांना राजकारणातही रस होता. अनेक राजकीय पक्षांनी त्यांना मागील विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर केली होती. मात्र त्यांनी ती ऑफर स्विकारली नाही.

--------------------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्याच्या निकालावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

2) वाहतूक समस्या सोडविण्यासाठी इचकरंजीत व्यासपीठ

3) 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, मंत्री धनंजय मुंडे

--------------------------------------------------

CBI चौकशीची मागणी

रुपेश सिंह हत्याकांडानंतर बिहारमधील राजकारण देखील आता तापलं आहे. माजी खासदार पप्पू यादव यांनी या घटनेची माहिती समजताच तातडीनं घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर, ‘बिहारमध्ये आता गुन्हेगारच सरकार चालवत आहेत, अशी टीका आरजेडी नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी केली आहे.

इंडिगो कंपनीनं देखील रुपेश यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘रुपेश यांच्या परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनी परिवाराच्या संपर्कात असून त्यांना संपूर्ण मदत केली जाईल,’’ असं इंडिगोनं स्पष्ट केलं आहे.