salaman khanentertainment news- बिग बॉसचा हा १४ वा सीझन सध्या राखी सावंतमुळे चांगलाच गाजतोय. शोचा होस्ट सलमान खान सुद्धा राखीला वेळोवेळी पाठींबा देताना दिसतो. तर अनेकदा तिच्या चुकांवर पडदा घालताना सुद्धा तो दिसून आला आहे. पण सोशल मीडियावर नुकताच बिग बॉस १४ चा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओमुळे सलमान खानसह (salman khan) या शोच्या मेकर्सवरही सोशल मीडियावरून (social media) जोरदार टीका होताना दिसत आहे. या आठवड्याच्या ‘विकेंड का वार’मध्ये अभिनव शुक्लाला समज देत राखीची बाजू घेणं सलमान खानला चांगलच महागात पडलं आहे.

मागच्या काही आठवड्यांपासून राखी सावंत सातत्यानं अभिनव शुक्लासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. मात्र या आठवड्यात तिनं अभिनव सोबत जे काही वर्तन केलं ते अतिशय अशोभनिय असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. मात्र कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून (instagram account) शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान राखी सावंतची बाजू घेताना दिसत आहे. त्याच्या मते शोमध्ये राखी सावंतचं अभिनव शुक्लासोबतचं वर्तन हे केवळ मनोरंजनाचा भाग आहे आणि त्यामुळे सर्वाधिक फायदा हा अभिनवला होत आहे. पण यामुळे आता प्रेक्षकांनी सोशल मीडियवर सलमान खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आता युजर्सनी शोच्या मेकर्सवरही टीका केली आहे. केवळ टीआरपीसाठी तुम्ही एखाद्यावर असा अन्याय करणं चुकीचं आहे. तुम्हाला अशोभनिय वर्तन आणि मनोरंजन यातील फरक तरी कळतो का? असा प्रश्न युजर्सनी शोच्या मेकर्सना विचारला आहे.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

एका युजरनं लिहिलं, ‘मान्य आहे की, वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे शोचा टीआरपी वाढत आहे. पण सलमाननं राखीला तिच्या वागण्याचा जाब विचारायला हवा होता. त्याचं राखीची बाजू घेत अभिनवला समजावणं चुकीचं आहे आणि राखीच्या वागण्याची जर अभिनवला समस्या असेल तर ते बोलून दाखवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे.’

दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘कलर्स टीव्ही सुद्धा आता अशा गोष्टींना पाठींबा देणार आहे का? उद्या एखाद्या मुलीसोबत कोणी गैरवर्तन केलं तर ते करणाऱ्याची बाजू घेतली जाईल का? मग अभिनवसोबत अन्याय होत असताना राखीची बाजू कशी काय घेतली जाऊ शकते?’

राखी सावंत अशाप्रकारे सोशल मीडियावर (social media) ट्रोल होण्याची ही या सीझनमधली पहिलीच वेळ नाही. तिच्यामुळे सलमान (salman khan) सुद्धा अनेकदा चाहत्याकडून ट्रोल व्हावं लागलं आहे. मात्र यावेळी मकर्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता याबाबत मेकर्स राखीबाबत काय निर्णय घेतात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे हेच जर मनोरंजन असेल तर मी हा शो सोडून जायला तयार आहे. मी अशाप्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकत नसल्याचं अभिनवनं म्हटलं आहे.