aly and jasminentertainment news- छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १४’ (#BiggBoss14) हा शो कायमच वादग्रस्त विधान किंवा टास्कमुळे चर्चेत असतो. मात्र, वादविवादांच्या पलिकडे जाऊन या घरात अनेकदा काही स्पर्धकांच्या प्रेमाला अंकुर फुटल्याचंदेखील पाहायला मिळतं. आतापर्यंत या शोमधील अनेक स्पर्धक त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे (love life) चर्चेत आले आहेत. त्यातच आता यंदाच्या पर्वात जास्मीन भसीन आणि अली गोनी यांच्या नात्याविषयी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अलीशी लग्न करणार का? या प्रश्नावर जास्मीनने तिचं उत्तर दिलं आहे.

अलिकडेच झालेल्या एका भागात अभिनेत्री सनी लिओनीने हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांसोबत एक टास्क खेळत असताना तिने अलीच्या मनातल्या भावना जॅस्मीन (#JasminBhasin )समोर व्यक्त करण्यास त्याला मदत केली. विशेष म्हणजे अलीच्या मनातील भाव जाणत जॅस्मीनने देखील त्याला लग्नासाठी होकार दिला.बिग बॉस १४ (#BiggBoss14) मध्ये रंगलेल्या भागात सनी डॉक्टर झाली होती. त्यामुळे पेशंट म्हणून अली आणि जॅस्मीन तिला भेटायला गेले होते. यावेळी सनीने अलीला गुडघ्यांवर बसून जॅस्मीनला प्रपोज (love life) करण्यास सांगितलं. विशेष म्हणजे अलीने प्रपोज केल्यानंतर, जर आई-वडिलांनी होकार दिला तर नक्कीच तुझ्याशी लग्न करेन, असं उत्तर जॅस्मीनने अलीला दिला.

दरम्यान, जॅस्मीन आणि अली यांच्या नात्याविषयी चाहत्यांमध्ये आणि बिग बॉसच्या घरात अनेक चर्चा रंगत आहेत. मात्र, या दोघांनीही याविषयी मौन बाळगलं असून ते एकमेकांना मित्र मानत असल्याचं कायम सांगतात.