use strong password for online use


आपल्याला सोशल मीडिया डेटा (social media data), ऑनलाईन ट्रान्जक्शन डिटेल्स, पासवर्ड आणि इतर महत्वाची सायबर माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर सावध राहा आणि एक स्ट्राँग पासवर्ड ठेवा. जेणेकरून कोणीही आपला पासवर्ड (strong password) तोडू शकणार नाही आणि तुम्ही सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकाल. अलीकडेच सर्वात धोकादायक आणि सहज हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ५० नवीन पासवर्ड जोडले गेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

दररोज इतके होतायेत सायबर हल्ले

आजकाल सायबर हल्ले सामान्य झाले आहेत आणि दररोज ४ लाख नवीन मालवेअर आढळतात आणि भारतात दररोज सायबर हल्ल्याच्या ३७५ घटना अधिकृतपणे नोंदवल्या जातात. जागतिक आकडेवारी यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा सोशल मीडिया (social media data) पासवर्ड, बँक ट्रान्जक्शनसाठी वापरलेला पासवर्ड स्ट्राँग ठेवला पाहिजे, असे नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेश पंत यांचे म्हणणे आहे.

--------------------------------------

Must Read
--------------------------------------

तुमचा पासवर्ड ठेवा सुरक्षित

जर तुम्ही Most Dangerous Passwords मधील पासवर्ड वापरत असाल तर तुम्ही तो बदला. यासह, या धोकादायक पासवर्डच्या यादीमध्ये जोडलेले सुमारे ५० नवीन पासवर्ड जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला सोपे होईल आणि तुम्ही अधिक सुरक्षित पासवर्ड (strong password) वापरण्यास सक्षम असाल. खरंतर, आजकाल एका क्षणी कोणावरही सायबर हल्ला होतो आणि लोकांच्या पैशाच्या तोटाबरोबरच वैयक्तिक डेटाही प्रसारित होण्याचा धोका असतो.

हे आहेत ५० पासवर्ड्स

सहजरित्या हॅक केलेल्या यादीमध्ये 50 नवीन पासवर्ड पुढील प्रमाणे आहेत...

picture1, senha, Million2, aaron431, evite, jacket025, omgpop, qqww1122, qwer123456, unknown, chatbooks, 20100728, 5201314, Bangbang123, jobandtalent, default, 123654, ohmnamah23, zing, 102030, 147258369, party, myspace1, asd123, a123456789, 888888, 888888, 147258, 999999, 159357, 88888888, 789456123, anhyeuem, 1q2w3e, 789456, 6655321, naruto, 123456789a, password123, hunter, 686584, iloveyou1, 25251325, love, 987654, princess1, 101010, 12341234, a801016 असे असे पासवर्ड कोणालाही सहजपणे उघडता येऊ शकतात. अशा परिस्थित तुम्ही यापैकी कोणतेही पासवर्ड वापरत असाल तर सावधगिरी बाळगा.