winter skin tips


हिवाळा येताच आपल्या शरीराची (health tips) स्थिती बदलू लागते. या दरम्यान फ्लू आणि इंन्फेक्शन पसरण्याचा धोका सुद्धा खुप वाढतो. बहुदा याच कारणामुळे लोक या हंगामात जास्त आजारी पडतात. गरम-गरम कॉफी, गरम कपडे आणि गरम पाणी (winter skin tips) तर या हवामानात मोठी गरज असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, या सर्व वस्तू आपल्या प्रकृतीसाठी किती नुकसानकारक ठरू शकतात.

उशीरापर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणे –

यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीवर वाईट परिणाम होतो. गरम पाणी केराटिन नावाच्या स्किन सेल्स डॅमेज करते. ज्यामुळे त्वचेची खाज, ड्रायेनस आणि रॅशेसची समस्या वाढते.

जास्त कपडे, गरम कपडे –

यामुळे बॉडी ओवरहीटिंग होऊ शकते. यामुळे इम्यून काम करत नाही.

-------------------------------------

Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------

जास्त खाणे –

या काळात आहार अचानक वाढतो. थंडीने खर्च झालेल्या कॅलरीची भरपाई, जास्त खाण्यातून केली जाते. हॉट चॉकलेट किंवा एक्स्ट्रा कॅलरीवाले फूड खाल्ले जाते. अशावेळी भूक लागल्यास केवळ फायबरवाल्या भाज्या आणि फळे खावीत.

कॅफीन –

हिवाळ्यात (winter skin tips) चहा आणि कॉफी जास्त पिणे हानीकारक ठरू शकते. कारण यामध्ये कॅफीन असते. 2 किंवा 3 कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.

कमी पाणी पिणे –

थंडीत कमी तहान लागते. कमी पाणी प्यायल्याने बॉडी डिहायड्रेट होऊ लागते. यामुळे किडनी आणि डायजेशनची समस्या वाढते.

झोपण्यापूर्वी काय करावे –

एका शोधानुसार, स्लीपिंग क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पाय ग्लव्हजने कव्हर करा.

बेडटाइम रूटीन –

या काळात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. अशा दिनचर्येमुळे सिर्काडियन सायकल डिस्टर्ब होते, तसेच शरीरात मेटालोनिन हार्मोन (झोप देणार हार्मोन) चे प्रोडक्शन सुद्धा वाढते. यामुळे झोप येते. सुस्ती वाढते. यासाठी स्लीपिंग टाइममध्येच चांगली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

बाहेर जाणे टाळणे –

हिवाळ्यात थंडीमुळे लोक बाहेर जाणे टाळातात. याचा आरोग्यावर खुप परिणाम होतो. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी खराब होते. लठ्ठपणा वाढतो आणि सूर्याच्या किरणांतून मिळणारे व्हिटॅमिन-डी सुद्धा मिळत नाही.

एक्सरसाइज –

थंडी जास्त असल्याने लोक एक्सरसाइज टाळतात. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी शून्य झाल्याने इम्यून सिस्टम सुस्त पडते. यासाठी सायकलिंग, वॉकिंग किंवा इतर वर्कआऊट करा.

सेल्फ मेडिकेशन –

या हंगामात लोकांना नेहमी खोकला, ताप, सर्दीची समस्या होते. अशावेळी डॉक्टरच्या तपासणीशिवाय सेल्फ मेडिकेशन जीवघेणे ठरू शकते. ही एखाद्या गंभीर आजाराची सुद्धा लक्षणे असू शकतात. यासाठी कोणतेही औषध किंवा उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.