ajinkya rahane



sports news- मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीच्या विजयाचा शिल्पकार भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे (cricketer) याचं कौतुक सर्वजण करत आहेत. त्याच्या नेतृत्वानं सर्वांना प्रभावित केलं आहे. आजी-माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांची भर पडली आहे. रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण आहेत. कौशल्य आणि धाडस या गुणांमुळे तो आपला ठसा उमटवतो, अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी केली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान चॅपेल म्हणाले, ‘‘मेलबर्न क्रिकेट मैदानावर रहाणेने निर्दोष नेतृत्व केले. २०१७मध्ये ज्यांनी धरमशाला येथे रहाणेला नेतृत्व करताना पहिले असेल, त्यांनी त्याच्यातील ही नेतृत्व कला त्याचवेळी ओळखली असेल,’’ असे चॅपेल यांनी सांगितले.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

माजी कर्णधार इयान चॅपेल (cricketer) म्हणाले, ‘२०१७ मध्ये धरमशाला येथील सामन्यात त्यानं घेतलेल्या निर्णायानं मी प्रभावित झालो होतो. शतकी खेळी करणार्‍या डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांना रोखण्यासाठी रहाणेनं पदार्पण करणार्‍या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक साहसी पाऊल होते. यादवने वार्नरची विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने विजय मिळवला.’ (sports news)

‘‘जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा तो शांतपणे त्याला सामोरा जातो. त्याने संघातील सहकाऱ्यांकडून योग्य आदर मिळवला आहे, जो चांगल्या कर्णधारासाठी आवश्यक असतो,’’ असं कौतुक चॅपेल यांनी मराठमोळा रहाणेचं केलं आहे.