anushaka sharmaप्रेग्नंट अनुष्का शर्मा (anushaka sharma) सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर प्रेग्नंसीकाळात वोग इंडिया या मॅगझिनसाठी तिने केलेले फाटोशूट.  होय, तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (viral on social media) होत आहेत. पण सोबत या फोटोशूटमुळे (photoshoot) अनुष्काला जबरदस्त ट्रोलही केले जातेय.

या फोटोत अनुष्का बोल्ड अंदाजात बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. अनुष्काने स्वत: यापैकी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी या फोटोंचे कौतुक केले. पण काहींनी मात्र यावरून अनुष्काला चांगलेच फैलावर घेतले.
या असल्या फोटोशूटची (photoshoot) खरोखरच गरज आहे का?असा सवाल एक इन्स्टाग्रामरने केला. अन्य एकाने करायचे तर फोटोशूट कर, पण हे असले फोटो पब्लिकला कशाला दाखवतेस, अशा शब्दांत तिला फटकारले. काहींनी अनुष्का व विराट आपल्या न जन्मलेल्या मुलाची जाहिरात करत असल्याची, न जन्मलेल्या मुलाच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याची टीका (viral on social media) केली. 

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

अनुष्का शर्माची (anushaka sharma) प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे.  विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. 
यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.   या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटली मध्ये लग्न केले.