anita video viral on social mediaentertainment news- छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनीता हसनंदानी. ती सोशल मीडियावर प्रचंड (viral on social media) सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती लवकरच एक गोड बातमी देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करताना दिसत आहे. आता अनीताने बेबी बंपसह चक्क शकिरा गाण्यावर डान्स केला आहे.

नुकताच अनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (instagram post)एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी बंपसह शकिरा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘एकदा जो कोणी शकिराचा फॅन होतो तो कायम शकीराचा फॅन राहतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------


सध्या अनीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (viral on social mediaझाला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये तिने आणि तिच्या पतीने सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.