amul-offers-franchise-business-opportunity-in-2021

(Amul Milk) कोरोना (Covid 19) काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business) लोक करत आहेत. या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळं कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतात मोठ्या प्रमाणात डेअरी प्रॉडक्ट बनवणारी अमूल (amul franchise cost) कंपनी त्यांची फ्रँचायझी देत असून तुम्ही या माध्यमातून पहिल्याच दिवशी चांगली कमाई करू शकणार आहात. आज आम्ही तुम्हाला याच व्यवसायाविषयी सांगणार असून यामधे तुमचा कोणत्याही पद्धतीचा तोटा होणार नाही.

व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च

या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला 2 लाख ते 6 लाख रुपयांच्या भांडवलाची गरज आहे. यामध्ये कंपनी कोणत्याही प्रकारचा नफा मागत नसून तुम्ही या व्यवसायाच्या मदतीने महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची कमाई करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला जागा आणि ग्राहक जास्त आहेत की नाही याचा देखील अंदाज घ्यावा लागणार आहे.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

या पद्धतीने घ्या फ्रॅन्चायझी

अमूल आपल्या 2 प्रकारच्या फ्रॅन्चायझी देत आहे. यामध्ये अमूल आइसक्रीम स्‍कूपिंग पार्लर आणि अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियॉस्‍क अशा 2 पद्धतींची फ्रॅन्चायझी देत आहे. (Amul Milk) यामधे पहिल्या प्रकारची फ्रॅन्चायझी घेण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपयांची गुंतवणूक लागणार आहे तर दुसऱ्या प्रकारासाठी 2 लाख रुपये गुंतवणुक करावी लागणार आहे. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल बॉण्ड देखील दयावा लागणार आहे.

इतकं कमिशन मिळणार

अमूल आपल्या प्रत्येक उत्पादनावर कमिशन(Comission) देत असते. या माध्यमातून तुम्ही विविध उत्पादनांची विक्री करून मोठा नफा मिळवू शकता. यामध्ये अमूलच्या दुधावर अडीच टक्के, आईस्क्रीमवर 20 टक्के तर इतर उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते. याचबरोबर आईस्क्रीम पार्लरमध्ये आइसक्रीम, शेक, पिझ्झा, सॅन्डविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन देते. यामुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याने महिन्याला चांगली कमाई होऊ शकते.

इतकी हवी जागा

यामध्ये अमूलच्या आउटलेटसाठी तुमच्याकडे कमीतकमी 150 स्क्वेअर फूट जागा हवी. तर आईस्क्रीम पार्लरसाठी 300 स्क्वेअर फूट जागा हवी. ही फ्रॅन्चायझी मिळवण्यासाठी तुम्ही retail@amul.coop या वेबसाईटवर अर्ज करू शकता. त्याचबरोबर http://amul.com/m/amul-scooping-parlours या वेबसाईटवर यासंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता.